5G नेटवर्क वापरण्यासाठी नवीन 5G सिम घ्यावे लागणार का?

0

दि.5: देशात 5G सेवा लवकरच सुरू होणार आहे. Reliance Jio, Airtel व Vi 5G सेवा लवकरच सुरू करणार आहे. Jio व Airtel 15 ऑगस्ट निमित्त काही शहरात 5G सेवा सुरू करू शकते. देशात 4G सेवा सुरू झाल्यानंतर मोबाईल फोन 4G व सिमकार्ड नवीन 4G देण्यात येत होते.

आता देशात 5G ची घोषणा केल्यानंतर अनेक मोबाईल ग्राहकांना 5G सिमकार्डसाठी फोन येऊ लागले आहेत. हे फोन कॉल्स फ्रॉड आहेत. सध्यातरी कोणत्याही कंपनीने 5जी सिमकार्डची घोषणा केलेली नाही. मग अशावेळी रिलायन्स जिओने 15 ऑगस्टपासून 5G सेवा सुरु केली तर त्याचे नेटवर्क कसे मिळणार आदी अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

तूर्तास तरी 4G सारखे 5G करिता सिम बदलण्याची गरज नाही. कारण 4G च्या सिमकार्डवरच तुम्हाला 5G नेटवर्क मिळणार आहे. यासाठी तुम्हाला वेगळे ५जी सिमकार्ड लागणार नाहीय. यामुळे अशा फ्रॉड कॉल्सना भुलून तुम्ही फसू नका. तुमचा ओटीपी मागतील आणि तुम्हाला लुबाडतील. सावध रहा.

तुमच्याकडे 5जी मोबाईल असेल आणि जर त्यात 4G LTE वर काम करणारे सिमकार्ड असेल तर तुम्हाला 5G सर्विस वापरण्यासाठी तेच सिमकार्ड वापरावे लागणार आहे. सुरुवातीला कंपन्या वेग वाढवून तुम्हाला 5G सेवा देणार आहेत. तुम्ही तुमच्या सध्याच्या 4G सिम कार्डद्वारे 5G कॉल आणि डेटा वापरू शकणार आहात. मात्र, काही काळानंतर तुम्हाला चांगल्या कव्हरेजसाठी 5G SIM मिळू शकतात. टेलिकॉम कंपन्या फाईव्ह जी नेटवर्क रोलआऊट झाल्यानंतर बाजारात जी सिमकार्ड आणतील त्यावर 5G रेडी किंवा 5G तंत्रज्ञान लिहिलेले असू शकते.

2G युगात, स्मार्ट कार्ड ज्याला आपण सिम (सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल) म्हणतो ते जुन्या मोबाइल कम्युनिकेशन स्टँडर्डवर आधारित होते. पुढे 3G आले आणि ही संज्ञा USIM (युनिव्हर्सल सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल) मध्ये बदलली. ही नवीन स्मार्ट कार्डे 3GPP च्या नवीन मानकांवर आधारित होती. तांत्रिकदृष्ट्या, या नवीन सिम कार्डांना Rel 99+ USIM कार्ड देखील म्हटले जाते आणि ते 2G, 3G, 4G आणि अगदी 5G नेटवर्कसह फॉरवर्ड आणि बॅकवर्डसह.

स्टँडअलोन 5G (SA 5G) सेवांसाठी नवीन सिमकार्ड दिले जाते. परंतू हे नेटवर्क उभारणे एवढे महाग आहे की यासाठी कंपन्यांना दशके लागतील. SA 5G ही एक उच्च-दर्जाचे नेटवर्क आहे, जिथे सर्व नेटवर्क पायाभूत सुविधा 5G आर्किटेक्चरवर तयार केल्या आहेत. हे नेटवर्क जवळजवळ शून्य लेटन्सी, भन्नाट वेग आणि इनडोअर वापरण्यासाठी नेटवर्क कव्हरेज इनडोअर ऑफर करते. महत्वाचे म्हणजे अमेरिकेतही 4G SIM वरच 5G सेवा दिली जात आहेत. जर एखाद्या ग्राहकाला SA 5G वापरायचे असेल तरच त्याला 5G सिम दिले जाते. परंतू, त्याचे कव्हरेज खूप कमी, म्हणजे घर, ऑफिस आदी ठिकाणीच मिळू शकते.

तुम्हाला Airtel, Reliance Jio, Vi, किंवा नवीन कंपनी, म्हणजे अदानी डेटा नेटवर्कसाठी भारतात नव्या 5G सिमची आवश्यकता नाही. तथापि, भविष्यात, या कंपन्यांपैकी एखाद्याने SA 5G सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला तुमचे 4G सिम सोडून नवीन 5G सिम घ्यावे लागेल. व्होडाफोनही युरोपमध्ये देखील 4G सिमवरच ५जी सेवा देत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here