Home देश एटीएमचे कीपॅड प्लास्टिकऐवजी धातूचेच का असतात? जाणून घ्या यामागचे मोठे वैज्ञानिक आणि...

एटीएमचे कीपॅड प्लास्टिकऐवजी धातूचेच का असतात? जाणून घ्या यामागचे मोठे वैज्ञानिक आणि सुरक्षेचे कारण

0

सोलापूर,दि.५: आपण सर्वजण रोजच्या व्यवहारात किंवा गरजेनुसार ATM (एटीएम) मधून पैसे काढतो. एटीएमचा वापर करताना तुमच्या एका गोष्टी नक्कीच लक्षात आली असेल, ती म्हणजे एटीएमचे कीपॅड (संख्या असलेली बटणे) हे प्लास्टिकचे नसून धातूचे (लोखंड किंवा स्टेनलेस स्टीलचे) बनवलेले असतात.

संगणकाचे कीबोर्ड किंवा इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची बटणे प्लास्टिकची असतात, मग एटीएममध्येच धातूच्या कीपॅडचा वापर का केला जातो? ‘आजतक’ने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार, यामागे केवळ मजबूती हे कारण नसून तुमच्या बँक खात्याची सुरक्षा हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

१. ‘थर्मल कॅमेरा’ आणि हॅकिंगपासून बचाव

एटीएमचे कीपॅड धातूचे असण्यामागील सर्वात मोठे कारण सुरक्षेशी जोडलेले आहे. जेव्हा आपण बोटांनी एटीएमवर पिन (PIN) टाईप करतो, तेव्हा आपल्या शरीरातील उष्णता बटणांवर ट्रान्सफर होते.

जर कीपॅड प्लास्टिकचे असेल, तर बोटांची उष्णता त्या प्लास्टिकवर काही मिनिटांपर्यंत तशीच राहते.

तुमच्यानंतर आलेला एखादा चोर किंवा हॅकर ‘थर्मल कॅमेऱ्याच्या’ (Heat Sensing Camera) मदतीने त्या कीपॅडचा फोटो काढून तुम्ही नुकतेच कोणते नंबर दाबले होते, हे सहज शोधू शकतो.

मात्र, धातूच्या (मेटल) कीपॅडवर ही उष्णता अजिबात टिकून राहत नाही. धातू उष्णतेचा चांगला वाहक असल्याने बोटांचा स्पर्श निघून जाताच ती उष्णता लगेच पसरते आणि निघून जाते. त्यामुळे थर्मल कॅमेऱ्याच्या मदतीने तुमचा पिन चोरीला जाण्याचा धोका टळतो.

२. दीर्घकाळ टिकण्याची क्षमता (Durability)

एटीएम मशीनचा वापर दिवसभरात हजारो नागरिक करतात. प्लास्टिकचे कीपॅड वापरल्यास ते सततच्या घर्षणाने लवकर गुळगुळीत होणे, तुटणे किंवा त्यावरील अंक पुसले जाण्याची शक्यता जास्त असते. याउलट, धातूचे कीपॅड अत्यंत मजबूत असतात आणि अनेक वर्षे खराब न होता टिकतात.

३. तोडफोडीपासून आणि आगीपासून संरक्षण

अनेकदा एटीएम सेंटरवर चोरीचा प्रयत्न होतो किंवा आगीसारखी दुर्घटना घडते. अशा वेळी प्लास्टिकचे कीपॅड लगेच जळून किंवा तुटून नष्ट होऊ शकते. धातूचे कीपॅड मशीनच्या अंतर्गत सिस्टीमचे तोडफोडीपासून संरक्षण करते.

४. गंजरोधक आणि हवामानास अनुकूल

एटीएमच्या कीपॅडसाठी विशेष स्टेनलेस स्टील किंवा धातूचा वापर केला जातो, ज्यामुळे पावसाळ्यातील दमट हवामानातही ते गंजत नाहीत.

थोडक्यात काय तर, तुमच्या बँक खात्यातील पैसे आणि गुप्त पिन सुरक्षित राहावा यासाठीच बँका आणि एटीएम बनवणाऱ्या कंपन्या धातूच्या कीपॅडचा वापर करतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.