Brahman Mahasangh On Sujat Ambedkar: अफगाणिस्तान मधील भगवान बुद्धाच्या प्रतिमांची तोडफोड कोणी केली ? ब्राम्हण समाज आक्रमक

0

पुणे,दि.१२: Brahman Mahasangh On Sujat Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी मशिदींवरील लाऊड स्पीकरवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंनी अमित ठाकरे यांना हनुमान चालीसा येती का? ते पहावे असे वक्तव्य यापूर्वी केले होते. आत्तापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, मग ती बाबरी मस्जिदची दंगल असो किंवा भीमा-कोरेगावची दंगल असो. आपण हेच बघितलयं की, दंगली पेटवणारे हे उच्चवर्णीय आणि उच्चवर्णीय ब्राह्मण असतात. पण, त्यांच्या विधानावर प्रभावी होऊन, या दंगलीत सहभागी होतात ते जास्त करुन बहुजन पोरं असतात”, असं विधान सुजात आंबेडकर यांनी मीडियाशी बोलताना केलं होतं. 

सुजात आंबेडकरांच्या (Sujat Ambedkar) याच विधानावरून आता ब्राम्हण महासंघाने (Brahman Mahasangh) आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. सुजात यांच्याकडून शहाणपणाच्या वक्तव्याची अपेक्षा कधीच नव्हती, असा शब्दात ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) आंबेडकर यांच्यावर प्रहार केला आहे.

हेही वाचा दंगली पेटवणारे हे ब्राह्मण असतात तर दंगलीत सहभागी होतात ते बहुजन पोरं असतात: सुजात आंबेडकर

सुजातकडून शहाणपणाच्या वक्तव्याची आमची अपेक्षा या आधीही कधीच नव्हती आणि आताही नाहीये. त्यामुळे सुजाता आंबेडकरांच्या वक्तव्याच्या आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असे आनंद दवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे. दंगली ब्राम्हण घडवतात हे म्हणण्याआधी काल परवा राम नवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कोणी केल्या?, याचे उत्तर सुजात आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावे, असेही आनंद दवे (Anand Dave) म्हणाले आहेत.

सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध करताना दवे पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानमधील भगवान बुद्धाच्या प्रतिमांची तोडफोड कोणी केली ? याचं उत्तर सुजातने प्रकाशजींना विचारावे आणि सांगावे. तिथले उच्चवर्णीय होते की आणखी कोणी होते याचा अभ्यास सुजात यांनी करावा, असा टोला आनंद दवे यांनी लगावला आहे.

हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी आज सुद्धा आमचा दलित बंधू काम करत आहे. याच कारणामुळे आज आम्ही फक्त सुजातचा निषेध व्यक्त करून थांबत आहोत, असेही दवे पुढे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here