ऑनलाईन सर्च करताना एस्कॉर्ट साइटवर दिसला पत्नी आणि बहिणीचा फोटो अन्…

पत्नी आणि बहिणीचा फोटो आढळला एस्कॉर्ट साइटवर

0

मुंबई,दि.१३: पती ऑनलाईन सर्च करताना एस्कॉर्ट साइटवर पत्नी आणि बहिणीचा फोटो दिसला अन् मोठा धक्का बसला. अलीकडच्या काळात फोटो महिलांचे फोटो चुकीच्या पद्धतीने वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा फेसबुकवरून महिलांचे फोटो घेऊन त्याचा दुरुपयोग केला जातो. अशामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे प्रकार उघडकीस आल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.

पत्नी आणि बहिणीचा फोटो आढळला एस्कॉर्ट साइटवर

मुंबईत खार येथे राहणारा एक व्यक्ती ऑनलाइन साइटवर मसाजर शोधत होता. पण सर्च करता करता त्याला असं काही आढळलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्याच पत्नी आणि बहिणीचा फोटो एका एस्कॉर्ट साइटवर अपलोड झाल्याचं त्याला आढळून आलं. याप्रकरणी पोलिसांनी आता रेशमा यादव नावाच्या महिलेला अटक केली आहे. 

संबंधित फोटो ३ ते ४ वर्ष जुना

पोलिसांना संशय आहे की रेशमा यादव त्याच गँगची सदस्य आहे जी सोशल मीडियात अनोळखी महिलांचे फोटो एस्कॉर्ट आणि मसाज साटइवर अपलोड करते. संबंधित व्यक्तीनं जेव्हा एस्कॉर्ट साइटवर आपल्या पत्नी आणि बहिणीचा फोटो पाहिला तेव्हा त्यानं तातडीनं याची माहिती दोघींनाही दिली. तेव्हा पत्नी आणि बहिणीनं संबंधित फोटो ३ ते ४ वर्ष जुने असून गैरवापर केला गेला असल्याचं निदर्शनास आणून दिलं. 

साइटवर दिलेल्या नंबरवर फोन केला आणि

ज्या व्यक्तीच्या पत्नी आणि बहिणीचे फोटो अपलोड केले गेले होते त्यानं संबंधित साइटवर एक फोन नंबर होता. त्यावर कॉल केला आणि समोरुन एका महिलेनं फोन उचलला जिचं नाव रेशम यादव असं होतं. तिनं भेटीसाठी खारमधील एका हॉटेलमध्ये त्याला बोलावलं. तो आपल्या पत्नी आणि बहिणीसह त्या हॉटेलवर पोहोचला जिथं रेशमा यादवनं भेटीसाठी बोलावलं होतं. जेव्हा रेशम यादवला तक्रारदार व्यक्तीच्या पत्नी आणि बहिणीनं फोटोंबाबतचा जाब विचारला तर ती वाद घालू लागली. तसंच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिला पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. 

पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि रेशम यादव हिला अटक केली आहे. कोर्टानं तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करताना सतर्क राहा आणि महत्वाची बाब म्हणजे आपलं प्रोफाइल लॉक करा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here