जगभरात WhatsApp, Instagram, फेसबुक डाऊन; तांत्रिक अडचणींमुळे वापरकर्ते हैराण

0

दि.4 : WhatsApp, Instagram, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरमध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरची सेवा खंडित झाली आहे. अँड्रॉईड, आयओएससोबतच डेस्कस्टॉपवरही समस्या  उद्भवत असल्यानं वापरकर्ते त्रासले आहेत. 

देशात अनेक यूजर्सना सोशल मीडिया वापरत असताना अडचणी येत आहेत. सोमवारी रात्री 8.30 नंतर Whatsapp, Facebook आणि Instagram या फेसबुक संचलित तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कनेक्टिव्हिटी अचानक गेली. Whatsapp down असल्याचं अधिकृतरीत्या अद्याप सांगण्यात आलेलं नसलं तरी जगभरात मोठ्या प्रमाणावर या मोबाइल ॲपला तांत्रिक अडचणींनी घेतलं होतं. तसंच भारतातल्या अनेक यूजर्सना facebook आणि instagram वापरतानाही अडचणी येत होत्या.

फेसबुकच्या ताब्यातल्या सगळ्याच सोशल मीडिया ॲप्सना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने यूजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी Facebook ने twitter ची मदत घेतली. Instagram आणि whatsapp सुद्धा बंद पडल्याने फेसबुकने ट्वीट करून याची दखल घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here