WhatsApp Group: यामुळे WhatsApp ग्रुप Adminचे होऊ शकते मोठे नुकसान

0

दि.२१: WhatsApp Group Admin: WhatsApp वापर अनेकजण करतात, WhatsApp हे जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अनेकजण मेसेज करतात. व्हॉट्सॲपमुळे अनेक महत्वाच्या घडामोडी अनेकांना कळतात. व्हॉट्सॲप ग्रुपचा ॲडमिन असतो. ज्याच्याकडे अनेक अधिकार असतात. तो एखाद्याला ग्रुपमध्ये ॲड करू शकतो आणि एखाद्याला काढूनही टाकू शकतो. पण, ॲडमिनवर अनेक जबाबदाऱ्या देखील असतात.

WhatsApp ग्रुपमध्ये अनेकजण मेसेज करतात, प्रत्येकजण आपापल्या परीने माहिती देण्याचा प्रयत्न करतात. तर काहीजण अशोभनीय मेसेजही करतात. अनेकजण द्वेषपूर्ण मेसेज करतात. ग्रुपमध्ये कोणतेही बेकायदेशीर काम झाल्यास त्याची जबाबदारी फक्त ग्रुप ॲडमिनची असते. अशा परिस्थितीत ग्रुपमध्ये कोणत्या प्रकारचा कंटेंट शेअर केला जात आहे. याविषयी ग्रुप ॲडमिनला माहिती असणे आणि समज असणे आवश्यक आहे. अन्यथा, ग्रुप ॲडमिनला तुरुंगवासही होऊ शकतो. तुम्हीही जर एखाद्या ग्रुपचे ॲडमिन असाल तर तुम्ही या ५ गोष्टी लक्षात ठेवा.

देशविरोधी मजकूर शेअर करू नका

ग्रुपमध्ये कोणीही देशविरोधी मजकूर शेअर करू नये. ही ॲडमिनची जबाबदारी आहे. यामुळे ग्रुप ॲडमिनला तुरुंगवासही होऊ शकतो. उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये याप्रकरणी एका व्यक्तीला (ग्रुप ॲडमिन) अटक करण्यात आली आहे.

अश्लील मजकूर शेअर करू नका

ग्रुपमध्ये अश्लील मजकूर शेअर करणेही गुन्ह्याच्या कक्षेत येते. उदाहरणार्थ चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित मेसेज शेअर करणे हा गुन्हा आहे.

वैयक्तिक व्हिडिओ किंवा फोटो शेअर करू नका

व्हॉट्सॲप ग्रुपवर कोणाचेही वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ परवानगीशिवाय शेअर करू नका. असे केल्यास तो गुन्ह्याच्या कक्षेत येतो. यावरही कारवाई होऊ शकते. मग तो ॲडमिन असो वा इतर कोणीही.

हिंसा भडकावणाऱ्या पोस्ट शेअर करू नका

जर कोणी धर्माचा अपमान करणारा व्हिडिओ पोस्ट केला तर हिंसाचार भडकावल्याबद्दल पोलीस त्याला अटक करू शकतात.

फेक न्यूज देखील पोस्ट करू नका

व्हॉट्सॲपवर कुणीही काहीही लिहून पोस्ट करतो आणि ते शेयर केले जात असल्याचे असे दिसून आले आहे. यासंदर्भात एक कायदाही बनवण्यात आला आहे, ज्याअंतर्गत जर कोणी फेक न्यूज चालवणाऱ्यांविरोधात तक्रार केली तर त्याचे अकाउंट खाते बंद केले जाते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here