शेतकऱ्यांचे गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान

0

नाशिक,दि.20: महाराष्ट्रात आज पाचव्या व शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. राज्यात शेतकरी कांदा निर्यातीवरून प्रचंड नाराज आहे. याची प्रचिती आजच्या दिवशी दिसून आली. नाशिक लोकसभा मतदार संघातही आज मतदान होत आहे. इथं कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्याचा मतदानावर देखील परिणाम होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदे आणि टोमॅटोचा वापर करत मतदान केले.

शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या प्रकाराची चांगली चर्चा रंगल होती. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला.

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला. शेतकरी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानाला गेले.

या शेतकरी तरुणांना मतदान केंद्राचे गेटवरवरच पोलिसांनी अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत मतदानाला गेले.

“ज्यांनी केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेची संधी,” अशा घोषणाही या शेतकरी तरुणांनी यावेळी दिल्या. या प्रकारामुळं वडगाव इथं मोठा जनसमुदाय गोळा झाला होता पण पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणलं. शेतकऱ्यांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. त्यामुळे याचा मतदानावर परिणाम दिसून येईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here