Vladimir Putin On Ukraine: व्लादिमीर पुतीन यांनी सैनिकांना युद्धाचा निकाल लावण्याचे दिले आदेश

0

दि.२५: Vladimir Putin On Ukraine: रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) हल्ले तीव्र केले आहेत. रशिया युक्रेनमध्ये (Russia Ukraine) चर्चेतून मार्ग निघाला नाही. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध कधी संपणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin On Ukraine) यांनी रशिया सैन्याला ९ मे पर्यंत युद्ध संपवण्याच्या सूचना दिल्या आहेत. Kyiv Independent ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. युक्रेनच्या सैन्यातील एका कमांडरच्या दाव्यानुसार पुतीन (Vladimir Putin On Ukraine) यांनी रशियन सैन्याला ९ मेपर्यंत युद्ध संपवण्याचा आदेश दिला आहे. ९ मे हा दिवस रशियासाठी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. याच दिवशी रशियन सैन्याने नाझी फौजांवर मिळवलेल्या विजयाचा स्मृतीदिन साजरा केला जातो.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा (Russia Ukraine War) आजचा ३० वा दिवस आहे. सध्या रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्हवर आणखी जोरदार हल्ले सुरु केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला युक्रेनमधील (Ukraine) अनेक नागरिकांना बळजबरीने रशियात नेले जात असल्याचा आरोप होत आहे. युक्रेनच्या या नागरिकांना बंदी करण्याचा डाव रशियाने (Russia) आखल्याचे बोलले जात आहे. जेणेकरून युद्धातून माघार घेण्यासाठी युक्रेनवर दबाव आणला जाऊ शकतो. आतापर्यंत तब्बल चार लाख युक्रेनियन नागरिकांना रशियात नेण्यात आले आहे. यामध्ये ८४ हजार लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती युक्रेनचे अधिकारी लयूडमयला डेनिसोवा यांनी दिली.

युक्रेनवर रशिया रासायनिक अस्त्रांचा मारा करणार?

युक्रेनशी युद्ध पुकारल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र, तरीही रशिया आक्रमकच आहे. आगामी काळात रशिया युक्रेनमध्ये रासायनिक अस्त्रांचा वापर करू शकते, असेही सांगितले जात आहे. तसे घडल्यास अमेरिका काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here