Vladimir Putin News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन बाबत रशियाच्याच गुप्तचर अधिकाऱ्याने केला खळबळजनक दावा

0

दि.31: Vladimir Putin News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) बाबत रशियाच्याच गुप्तचर अधिकाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. रशियन गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने पुतीन यांच्या प्रकृतीची माहिती गुप्तपणे युरोपमध्ये राहणारे माजी रशियन गुप्तहेर बोरिस किरपिचनिकोव्ह यांना पाठविली होती. तो संदेश युरोपच्या गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आहे. यात पुतीन यांचे हात पाय थरथर कापत असल्याचेही म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांना पोटाचा कॅन्सर झाल्याचेही सांगितले जात आहे. लवकरच त्यांच्यावर ऑपरेशन होणार अशाही चर्चा असताना आता रशियाच्याच गुप्तचर अधिकाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. 

रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्याने पुतीन यांना कॅन्सरचा विळखा पडला असून त्यांची नजर वेगाने कमजोर होऊ लागल्याचा दावा केला आहे. इंडिपेंडंट वृत्तपत्राला त्यानेही माहिती दिली आहे. पुतीन हे आणखी तीन वर्षेच जिवंत राहू शकतात, असेही त्याने म्हटले आहे. 

69 वर्षीय पुतिन यांना कर्करोग असल्याचे निदान झाले आहे, यामुळे त्यांची तब्येत ढासळत आहे, अशा चर्चा जगभरात सुरु असताना हा दावा करण्यात आला आहे. मात्र, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी रविवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन आजारी असल्याच्या सर्व बातम्या फेटाळून लावत त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याचे सांगितले.
पुतीन यांना डोकेदुखीचा त्रास होतोय, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. जेव्हा ते टीव्हीवर जनतेला संबोधित करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना मोठ मोठ्या अक्षरात लिहिलेल्या कागदांची गरज भासते. छोटी अक्षरे त्यांना वाचता येत नाहीत. ही अक्षरे एवढी मोठी असतात की एका पानावर एक किंवा दोन वाक्येच मावतात. पुतीन यांची दृष्टी गंभीरपणे कमजोर होत चालली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. 

रशियन गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने पुतीन यांच्या प्रकृतीची माहिती गुप्तपणे युरोपमध्ये राहणारे माजी रशियन गुप्तहेर बोरिस किरपिचनिकोव्ह यांना पाठविली होती. तो संदेश युरोपच्या गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आहे. यात पुतीन यांचे हात पाय थरथर कापत असल्याचेही म्हटले आहे. 

यावर रशियाचे मंत्री लावरोव यांनी म्हटले की, “मला वाटत नाही की समजूतदार लोकांना पुतीन यांच्यात काही आजार किंवा आजाराची चिन्हे दिसू शकतात. पुतीन आता ऑक्टोबरमध्ये 70 वर्षांचे होतील, परंतू ते दररोज लोकांसमोर येतात. तुम्ही त्यांना ठळकपणे टीव्हीवर चालताना पाहू शकता, बोलताना पाहू शकता, त्यांचा आवाज ऐकू शकता, असे ते म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here