Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू?

0

दि.30: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचा मृत्यू झाल्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या तब्येत ठीक नसल्याचा चर्चा सुरु होत्या. अशातच आता ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. पुतीन (Vladimir Putin) यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असा दावा या गुप्तचर यंत्रणेद्वारे करण्यात येतोय. दरम्यान या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे.

रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांच्या मृत्यूची बातमी लपवण्यासाठी त्यांच्या बॉडी डबलचा वापर केला जात असल्याचाही आरोप करण्यात येतोय. याबाबत ब्रिटनच्या मिरर बेवसाईट ‘द डेली स्टार’च्या हवाल्याने वृत्त देण्यात आलंय.

द डेली स्टारच्या हवाल्याच्या बातमीनुसार, पुतीन यांचा मृत्यू झाल्याची बातमी जगासमोर आली तर मोठी खळबळ उडू शकते. यासाठीच त्यांच्यासारखाच दिसणारा, देहबोली असणाऱ्या व्यक्तीकडून सर्व कारभार चालवला जात असल्याचा दावा MI6 च्या प्रमुखांनी केलाय आहे.

गेल्या काही दिवसांपासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कॅन्सरची लागण झाल्याचं म्हटलं जातंय. शिवाय पुतीन यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती होती. पुतीन त्यांच्या अनुपस्थितीत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि एफएसबी या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख निको

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कॅन्सर असल्याचं मध्यंतरी सांगितलं जात होतं. त्यावरील उपचारासाठी ऐन युद्धाच्या काळात पुतीन हे सुट्टीवर जाणार होते. पुतीन यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती.

या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने गंभीर आजारामुळे व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला असू शकतो, अशी शंका व्यक्त केलीये. शिवाय त्यांच्या मृत्यूची बातमी लपवण्यात येत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here