Vivo आणत आहे 50MP कॅमेरावाला जबरदस्त X80 Pro स्मार्टफोन, प्रोसेसर आणि डिस्प्लेही जबरदस्त

0

दि.19: Vivo च्या नवीन स्मार्टफोनची वाट पाहणाऱ्या युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कंपनी लवकरच आपली Vivo X80 स्मार्टफोनची मालिका लॉन्च करणार आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी तीन नवीन स्मार्टफोन X80, X80 Pro आणि X80 Pro Plus लॉन्च करणार आहे. दरम्यान, एका टिपस्टरने या सीरीजच्या एक व्हेरिएंट म्हणजेच Vivo X80 Pro च्या प्रोसेसर आणि कॅमेराबद्दल माहिती लीक केली आहे.

लिक्सनुसार, Vivo X80 Pro मॉडेल डायमेन्सिटी 9000 प्रोसेसरसह बाजारात येईल. जो मीडियाटेकचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. तर सोबत 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात येईल. हा सोनीचा IMX8 किंवा IMX800 सेन्सर असू शकतो. फोनमध्ये कंपनीनं स्वतःहून डेव्हलप केलेला विवो V1 चिपसेट देखील देऊ शकते, अशी माहिती टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं दिली आहे.  

Vivo X80 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन 

या फोनमध्ये 6.78 इंचाचा फुल एचडी+ E5 AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनमध्ये 8 जीबी पर्यंत लेटेस्ट LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते. वर सांगितल्याप्रमाणे यात मीडियाटेकचा डिमेन्सिटी 9000 चिपसेट मिळेल. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. तर अन्य तीन 12 मेगापिक्सलचे सेन्सर असतील. तर फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. Vivo X80 Pro मधील 4700mAh ची बॅटरी 80 वॉट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच 50 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्टही मिळेल.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here