विराट कोहलीने टीम इंडियाच्या विजयानंतर कापला बर्थ-डे केक

0

दि.6: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) शुक्रवारी वाढदिवस होता. भारतीय कॅप्टनला टीमनं स्कॉटलंडवर (India vs Scotland) दमदार विजय मिळवत गिफ्ट दिलं. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं स्कॉटलंडचा (India vs Scotland) 8 विकेट्सनं दणदणीत पराभव केला. भारतीय बॉलर्सनी सुरुवातीला भेदक मारा करत स्कॉटलंडला 85 रनमध्ये ऑल आऊट केलं. त्यानंतर 86 रनचं टार्गेट फक्त 39 बॉलमध्ये पूर्ण करत सर्वात मोठा विजय मिळवला

भारतीय टीम या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये परताच विराटच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी भारतीय टीममधील सर्व खेळाडू तसंच कोचिंग स्टाफ उपस्थित होता. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विराटनं वाढदिवसाचा केक कापला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ बीसीसीआयनं शेअर केला आहे.

या मॅचमध्ये विराट कोहलीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने स्कॉटलंडला 85 रनवर ऑल आऊट केले. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला 2 विकेट घेण्यात यश आलं. स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाने 6.3 ओव्हरमध्येच पार केलं. एवढ्या मोठ्या विजयामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेट चांगलाच सुधारला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here