Viral Video: राजधानी एक्स्प्रेस रेल्वेच्या धडकेतून असा बचावला तरुण, Video व्हायरल

0

मुंबई,दि.15: Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होतात. प्राण्यांचे, मनोरंजनात्मक व्हिडिओ, अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक खतरनाक (Dangerous Video) व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रेल्वेच्या धडकेतून दुचाकीस्वार कसा बचावल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल होत आहे. भरधाव वेगात असलेल्या ट्रेनमुळे त्याच्या बाईकचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. नेमकी अशीच एक घटना गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात घडली होती, जिथे ट्रेनने बाईक उडवली होती आणि त्या व्यक्तीचा थोडक्यात जीव वाचला होता.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओवरील टाईम स्टॅम्पमध्ये ही घटना 12 फेब्रुवारीच्या संध्याकाळी घडल्याचे दिसून येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन राजधानी एक्स्प्रेस असून ही घटना मुंबईची आहे. व्हिडिओमध्ये, तो व्यक्ती आपली बाईक सोडून शेवटच्या क्षणी आपला जीव कसा वाचवतो हे बघू शकता. ही क्लिप पाहिल्यानंतर इंटरनेट यूजर्संना चांगलाच धक्का बसला आहे.

काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी लोक आपला जीव कसा धोक्यात घालतात, या व्हिडिओवर यूजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “त्यामुळे… त्याची बाईक खराब झाली. त्याला 440 व्होल्टचा धक्का बसला असावा. त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे आणि हे सर्व काही मिनिटांचा वेळ वाचवण्याच्या प्रयत्नात घडले.

त्याचप्रमाणे दुसर्‍या यूजरनं म्हटले, प्रामाणिकपणे… या दुचाकीस्वारांना वाटतं की ते कोणत्याही गोष्टीतून जाऊ शकतात… मग तो रस्ता असो, फूटपाथ असो, रेल्वे क्रॉसिंग असो… खरे तर आरटीओला दुचाकी वाहन परवाना जारी करताना अधिक कठोर असले पाहिजे…”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here