Viral Video: प्रवाशांमध्ये विमानात जोरदार हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

0

सोलापूर,दि.29: Viral Video: प्रवाशांमध्ये विमानात जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. अनेकांनी रस्त्यावर हाणामारी झाल्याचे, बसमध्ये हाणामारी झाल्याचे व्हिडिओ पाहिले असतील. बँकॉकहून कोलकाताकडे (Kolkata) येणाऱ्या विमानामध्ये दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी (Viral Video) झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा Raj Thackeray: राज ठाकरे यांनी तरुण शेतकऱ्यांबाबत केलं मोठं वक्तव्य

विमानामध्ये तुफान राडा | Viral Video

आकाशात हजारो फूट उंच उडणाऱ्या विमानामध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. दोन प्रवाशांच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. असे अनेक व्हिडीओ याआधीही व्हायरल झाले आहेत. बँकॉकहून कोलकाताकडे येणाऱ्या थाय स्माइल एअरवेजच्या विमानामध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना 27 डिसेंबर रोजी घडल्याची माहिती समोर येत आहे.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल | Video Viral

या व्हायरल व्हिडीओमध्ये विमानामध्ये दोन प्रवासी एकमेकांसोबत भांडताना दिसत आहे. एक फ्लाईट अटेंडंट या दोन प्रवाशांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दोन्ही प्रवाशांमध्ये जोरदार बाचाबाची सुरु असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन्ही प्रवाशी एकमेकांवर ओरडताना दिसत आहे. एक प्रवासी दुसऱ्याला ‘हँड्स डाउन’ म्हणताना ऐकू येतो. हात खाली ठेवा, असे तो वारंवार ओरडताना दिसत आहे. काही वेळातच दोघांमधील हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचते.

Viral Video
विमानात हाणामारी

व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत

तुम्हांला व्हायरल व्हिडीओमध्ये दिसेल की, दोन प्रवाशांमध्ये वाद सुरु आहे. फ्लाईट अटेंडेंट हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही प्रवासी एकमेकांवर ओरडत आहेत. यावेळी एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाचा हात धरून त्याच्या कानशिलात मारतो. त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु होते. यावेळी इतर काही जणही या भांडणात सामील होतात. त्यानंतर पाच ते सहा जण एका प्रवाशाला मारहाण करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. विमानात उपस्थित इतर काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

जाहिरात


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here