Viral Video: तरुण रेल्वे रुळावरून चालवत होता बाईक इतक्यात आली रेल्वे

0

दि.12: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यात बरेचसे मनोरंजनात्मक असतात तर काही व्हिडिओ पाहून विश्वास बसत नाही. जीवाची पर्वा न करता अनेकजण स्टंट करतात जे करणे चुकीचे आहे. असे करणे जीवावर बेतू शकते. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काही लोक स्वतःच्या जीवाशीही खेळतात.सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पाहायला मिळाला, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी एक तरुण आपल्या जीवावर खेळत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुणाने जीवाचीही पर्वा केली नाही.

रेल्वे ट्रॅकवर घेऊन जातो बाईक

व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगा स्वतःला वाचवण्यासाठी करत असलेला जुगाड पाहून थक्क व्हाल. व्हायरल होण्यासाठी एक तरुण आधी बाइक घेऊन रेल्वे ट्रॅकवर जातो. तो रेल्वे ट्रॅकवर बाईक चालवत आहे. यादरम्यान ट्रेन येनार आहे असं समजत.

View this post on Instagram

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

तो बाईकसह कल्व्हर्टवर जात असताना समोरून रेल्वे रुळावर येते. यानंतर रेल्वे पुलाच्या त्या सिंगल ट्रॅकवर आपला जीव वाचवण्यासाठी जुगाड करतो. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की समोरून ट्रेन येत असल्याचे पाहून तो मुलगा घाबरून न जाता डोक वापरून जीव वाचवतो. तरूण आधी त्याची बाईक रुळांच्या कडेला सोडून स्वतः धावतो आणि खांबाला धरून उभा राहतो.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या पेजने शेअर केला आहे. हा व्हिडीओ ट्रेनमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने बनवला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ कुठला आहे हे सध्या तरी कळू शकलेले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here