VIRAL VIDEO: बिबट्या 10 फूट उंच भिंतीवरून कुत्र्याला गेला घेऊन

0

Leopard Dog Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बिबट्या पहिल्यांदा कुत्र्यावर हल्ला करतो. त्यानंतर त्याला तोंडात दाबून 10 फूट उंचीच्या गेटवरून उडी मारून बाहेर घेऊन जातो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिबट्या कुत्र्याला उचलून नेत आहे. बिबट्या कुत्र्याला पकडून 10 फूट उंचीच्या गेटवरून घेऊन जातो. या व्हिडिओवर युजर्सच्या अनेक कमेंट्स येत आहेत. हा व्हिडिओ छतरपूरचा आहे. मात्र त्याची पुष्टी झालेली नाही. आयएफएस (IFS) अधिकारी प्रवीण कासवान यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याला अनेकांनी रिट्विट केले आहे.

डेली मेलवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बिबट्याने सर्वप्रथम कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याला तोंडात दाबून 10 फूट उंचीच्या गेटवरून उडी मारून बाहेर घेऊन निघून गेला. हा व्हिडीओ डिसेंबर महिन्याचाच असल्याचे सांगितले जात आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून, त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, घटनेनंतर वनविभागाचे अधिकारीही पोहोचले. मात्र त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे सापडले नाहीत. परिसरात हा बिबट्या दिसण्यापूर्वीच त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. मात्र, बिबट्या पकडला गेला नाही.

वनविभागाने सांगितले की बिबट्या भटकत येथे आल्याचे सांगितले. त्याला पकडण्यासाठी परिसरात अनेक ठिकाणी पिंजरे आणि जाळ्या लावण्यात आल्या आहेत. त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here