दि.16: Viral Dance Video: अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina dilaik) बहुप्रतिभावान आहे आणि ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधते. रुबिना दिलैकने (Rubina dilaik) तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स करत आहे. रुबिना दिलैकचा (Rubina dilaik) हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतोय. या व्हिडिओमध्ये बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलैक तिच्या कोरिओग्राफरकडून डान्स शिकवला जात आहे. एवढेच नाही तर चाहते तिची जोरदार प्रशंसा करत असून एकाने लिहिले आहे की, ”शेरनी मोरनी भी बन सकती है.”
‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स करताना रुबिना दिलैकने लिहिले, ‘डान्स ही जादू आहे, नृत्य म्हणजे प्रेम आहे. आणि विविध नृत्य प्रकार शिकणे म्हणजे त्याच्या जादूचा पुरेपूर आनंद कसा घ्यावा हे जाणून घेणे. माझा गुरू सद्दाम सईद. रुबिना दिलैकने गेल्या वर्षी ‘शक्ती’ या मालिकेत काम केले होते. आता प्रतीक्षा आहे तिच्या ‘अर्ध’ या चित्रपटाची. रुबिनाने 2008 मध्ये प्रसारित झालेल्या ‘छोटी बहू’ या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर ती आता ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत दिसणार आहे. रुबिना बिग बॉस सीझन 14 ची विजेती देखील होती.