व्हिडीओ पाहून IPS अधिकाऱ्याने दिली मजेशीर प्रतिक्रिया
Viral Video: मराठीत एक म्हण आहे,”सरकारी काम सहा महिने थांब”. प्रत्येकाला सरकारी नोकरीचे (Government Job) स्वप्न असते, प्रत्येकाला चांगली सरकारी नोकरी मिळवायची असते, तर संपूर्ण आयुष्य आरामात जाईल असे वाटते. लोक सरकारी नोकरीचे स्वप्न पाहतात कारण भविष्यात नोकरी गमावण्याचा धोका नाही किंवा कामाचा दबाव नाही. त्यामुळेच तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात आणि काम पूर्ण व्हायलाही खूप वेळ लागतो.
कारण सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आरामात आणि त्यांच्या सोयीनुसार काम करायला आवडते. पण आता हे चुकीचे सिद्ध झाले आहे कारण एका सरकारी कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मशीनपेक्षा जास्त वेगाने काम करत आहे.
हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे, कारण कुणी पाहिल्या नंतरही सरकारी कार्यालयात एवढ्या वेगाने काम करणारे कोण असेल, याची खात्री होत नाही. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ सोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे – #खाजगीकरणाच्या बातम्या ऐकून सरकारी कामाच्या कार्यक्षमतेत अभूतपूर्व वाढ…
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती टेबलवर बसून मशीनच्या वेगाने कागदपत्रांवर शिक्का मारत आहे. हे बघून जणू यंत्र चालूच आहे असे वाटते. सरकारी कार्यालयात इतक्या वेगाने काम करताना तुम्ही कधी पाहिले आहे का?
रुपिन शर्मा यांनी त्यांच्या या व्हिडिओमध्ये अनेकांना टॅगही केले आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत 3 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत.