Viral Photo: सांगा या फोटोत किती हत्ती दिसत आहेत? अनेकजण गेले गोंधळून

0

दि.20: Viral Photo: अनेकदा धक्कादायक किंवा डोकं चक्रावून टाकणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी-कधी अशी अनेक चित्रेही दिसतात, जी पाहणे अगदी सोपे असते, पण जेव्हा आपण त्यांच्याकडे लक्ष देतो तेव्हा डोकं चक्रावून जाते. उदाहरणार्थ, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पहा. जे दिसायला अगदी साध्या चित्रासारखं वाटतं, पण ते पाहिल्यावर तुमचं डोकं चक्रावून जाईल.

वास्तविक, हा फोटो IFS अधिकारी सुसांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये प्रश्न विचारला आहे. त्यांनी विचारले आहे की, या चित्रात तुम्हाला किती हत्ती दिसतात ते सांगा. मग काय, क्षणाचाही विलंब न करता युजर्सनी या प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली.

हेही वाचा सहाय्यक प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्यात मारामारी, Video व्हायरल

फोटो पाहिल्यावर प्रत्येकाला वाटते हा प्रश्न अगदी सोपा आहे आणि चित्रात 4 हत्ती स्पष्ट दिसत आहेत. पण तुम्हीही असाच विचार करत असाल तर हे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे, कारण हा फोटो शेअर करणाऱ्या सुसांत नंदा यांनी स्वतःच्या दुसऱ्या ट्विटमध्ये या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ज्यात त्यांनी सांगितले आहे की, चित्रात 7 हत्ती आहेत. तुम्हालाही आश्चर्य वाटले नसेल तर तुम्हीही हा फोटो काळजीपूर्वक पहा कारण तरच तुम्हाला समजेल की चित्रात 7 हत्ती कुठे आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here