अंतरवली सराटीमधील ग्रामस्थांचा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध

0

जालना,दि.3: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवली सराटीमधील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. मनोज जरांगे हे उद्यापासून (दि.4) पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते. सगेसोयरीच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे आग्रही आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. (Villagers of Antarwali Sarathi oppose Manoj Jarange’s hunger strike)

मनोज जरांगे पाटील यांनी अगोदरच 4 जून पासून उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. या उपोषणाला अंतरवली सराटीमधील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मनोज जरांगे यांना यांना उपोषणाला परवानगी देऊन मी अशी मागणी केली आहे.

गावातील जातीय सलोखा बिघडू नये म्हणून मनोज जरांगे यांना उपोषणाला परवानगी देऊ नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर 70 जणांनी सह्या केल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here