Video: एका जहाजातून दुसऱ्या जहाजात हवेत उडत गेला जवान

0

दि.९: Video: अनेक बॉलीवूड हॉलिवूड चित्रपटात हिरो हवेत स्टंट करताना अनेकांनी पाहिले आहे. हिरो हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना चित्रपटात पाहिले असेल. हे काही खरे नसते तर मागे हिरव्या रंगात कापड लावून ते शूट केलेले असते नंतर ग्राफिक्सचा वापर करून ते रंगविले जाते. पण हवेतून एका जहाजातून दुसऱ्या जहाजात जाताना कधी पाहिले नसेल.

माणसांना पायांना किंवा हातांना लावलेल्या मशीनने उडून जावे असे वाटते. हे आता प्रत्यक्षात आले आहे. एक नौदलाच्या जवानाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. तो जेटपॅकद्वारे (Jetpacks) उडताना दिसत आहे.समुद्राच्या लाटा खूप उसळत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. एवढ्यात तो सैनिक एका छोट्या बोटीतून उडतो आणि दुसऱ्या बाजूच्या जहाजाच्या दिशेने जातो. लाटा खूप उसळत आहेत, पण त्यांची पर्वा न करता तो आरामात दुसऱ्या जहाजाच्या दिशेने उडत जातो.

जहाजावर गेल्यावर मग तो आपले हात पसरून त्या जहाजावर आरामात उतरतो. या यंत्राला जेटपॅक्स म्हणतात आणि ही एक प्रकारची भविष्यातील मोटरसायकल आहे. ज्याला एखादी व्यक्ती खांद्यावर टांगून प्रवासाला सुरुवात करेल. या व्हिडीओला लाखो व्हूव्ज मिळाले आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here