दि.20: Video: अनेकवेळा स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्यानंतर किंवा बॅटरी फुगल्यामुळे अशा घटना घडू शकतात. स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहे. आता मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये अशीच धक्कादायक घटना घडल आहे. एका तरुणाच्या हातातच मोबाईलचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फोनच्या दुकानातच तरुणाच्या हातात मोबाईलचा स्फोट झाला. ही घटना बालाघाट शहरातील कनकी या गावातील असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाघाटच्या कनकी येथील बंटी लिल्हारे नावाच्या तरूणाचं मोबाईल रिपेयरिंगचे दुकान आहे. घटना घडली त्यावेळी बंटीकडे ग्राहकाचा फोन होता. यावेळी फोनचा अचानक स्फोट होऊन आग लागली. आग लागतच बंटीने फोन लांब फेकल्याने आजुबाजूला असलेल्या कोणालाही दुखापत झाली नाही.
फोनची बॅटरी खराब झाली असेल अथवा फुगली असल्यास त्वरित सर्विस सेंटर अथवा मोबाईल रिपेयरिंगच्या दुकानात जाऊन चेक करण्याचे आवाहन देखील बंटीने केले आहे. मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. याआधी देखील फोनचा स्फोट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.