Viral Video : पळून जाण्यासाठी चोराने केला असा जुगाड, पोलिसांसमोर झाला छोट्या खिडकीतून फरार

0

Viral Video त चोर छोट्या खिडकीतून बाहेर पडताना दिसत आहे. चोराने पोलिसांसमोर छोट्या खिडकीतून बाहेर पडून दाखवले

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस अरुंद खिडकीतून आत शिरताना आणि क्रॉस करताना दिसतो. हा व्हिडिओ आजवर ज्या कोणी पाहिला असेल त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. एवढ्या छोट्या खिडकीतून कोणी कसे काय जाऊ शकते, असा विचार प्रत्येकजण करत आहे. पण, व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीने हे काम अगदी सहज केले.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या छोट्या खिडकीतून आत जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी ती व्यक्ती एक खास पद्धत अवलंबते. सर्व प्रथम तो आपले दोन्ही पाय खिडकीच्या आत ठेवतो. प्रथम तो त्याच्या शरीराचा खालचा भाग खिडकीच्या त्या बाजूला सरकवतो. मग हळू हळू तो त्याच्या शरीराचा वरचा भाग खिडकीजवळ आणतो आणि मग अतिशय आश्चर्यकारक रीतीने तो खिडकीतून डोके बाहेर काढतो आणि त्याच्या पलीकडे जातो. एकदा पाहिलं तर या छोट्या खिडकीच्या आत तो अडकून बसेल असं वाटतं. या व्यक्तीच्या चकित करणाऱ्या कृत्याने सर्वांचेच मन जिंकले आहे.

Doctor Gulati L L B (डॉक्टर गुलाटी एल एल बी) नावाच्या पेजने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘पोलिसांना खात्री नव्हती की हा माणूस या खिडकीतून कसा बाहेर पडेल.. म्हणून मग चोराने डेमो दाखवला’…एवढ्या अरुंद खिडकीतून हा चोर कसा बाहेर आला हे पाहावे म्हणून पोलीस कर्मचाऱ्यानेच या चोराला खिडकीजवळ आणल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पोलिसही दिसत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here