शालेय विद्यार्थीनींचा चालत्या बसमध्ये दारू पिऊन धिंगाणा करतानाचा video viral

0

दि.२७: video viral: शालेय विद्यार्थीनींचा चालत्या बसमध्ये दारू पिऊन धिंगाणा करतानाचा video व्हायरल झाला आहे. शालेय विद्यार्थिनींचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तमिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात शालेय विद्यार्थीनी चालत्या बसमध्ये दारू पिऊन धिंगाणा करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाळकरी मुली शाळेच्या गणवेशात चक्क बिअर पिताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा तपास केला असून या घटनेला दुजोराही दिला आहे. ही काही खोटी घटना नाही, असं देखील अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

सर्व मुले सरकारी शाळेतील विद्यार्थी आहेत. सोशल मीडियावर अपलोड केलेली क्लिप एका विद्यार्थ्याने रेकॉर्ड केल्याचे समजते. व्हिडीओमध्ये मुले आणि मुली दोघेही बिअरच्या बाटल्या उघडून पितात. सर्व विद्यार्थी चेंगलपट्टू येथील सरकारी शाळेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला जुना व्हिडीओ असल्याचे समजल्यानंतर ही घटना मंगळवारी घडल्याचे समोर आले. थिरुकाझुकुंद्रम ते ठाचूर असा प्रवास करत असताना मंगळवारी ही घटना घडल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले की, शाळेबाहेर घडलेली घटना व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वाटेत चालत्या बसमधील मुला-मुलींच्या एका गटाने बिअरच्या बाटल्या उघडल्या आणि पिण्यास सुरुवात केली. चेंगलपट्टू जिल्हा शिक्षण अधिकारी रोज निर्मला यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. “ही घटना शाळेबाहेर घडली असल्याने पोलीस त्याचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलिसांचा तपास संपल्यानंतर आम्ही आमच्या स्तरावर विद्यार्थी व विद्यार्थिनींवर योग्य ती कारवाई करू.”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here