दि.२८ :कानपूर येथील एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याच्या निवासस्थानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वरिष्ठ आयएएस इफ्तेखारुद्दीन त्यांच्या निवासस्थानी एका धार्मिक नेत्यासह काही लोकांसमोर इस्लाम स्वीकारण्याचे फायदे सांगत आहेत. व्हिडिओमध्ये इस्लामिक वक्ता इस्लाम स्वीकारण्याचे फायदे सांगण्यासह तेथे उपस्थित असलेल्या लोकांना अनेक कथा सांगत आहे. तो सांगतो की इस्लाममध्ये बहिणी आणि मुली जाळल्या जात नाहीत. त्यात पुढे म्हटले आहे की, अल्लाहने आम्हाला उत्तर प्रदेशच्या रूपात असे केंद्र दिले आहे जिथून संपूर्ण देश आणि संपूर्ण जग काम करू शकेल. ‘एबीपी लाइव्ह’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
वरिष्ठ आयएएस इफ्तेखारुद्दीन तेथे बसलेल्या लोकांना इस्लामचे धडे शिकवत असल्याचा आरोप आहे. IAS इफ्तेखारुद्दीन जमिनीवर बसलेले दिसत आहेत, जेव्हा एक मुस्लिम वक्ता IAS च्या अधिकृत निवासस्थानी धडे शिकवत होता.
व्हिडिओत ते धर्मगुरू असंही म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी पंजाबमधल्या एका व्यक्तीने इस्लाम कबूल केला (इस्लाम धर्म स्वीकारला). तेव्हा मी त्यांना धर्म स्वीकारण्याचं आमंत्रण दिलं नव्हतं किंवा आग्रहही केला नव्हता. त्यांनी इस्लाम का कबूल केला, असं त्यांना विचारला असता, ते म्हणाले, की त्यांनी त्यांच्या बहिणीच्या मृत्यूच्या कारणामुळे इस्लाम धर्म स्वीकारला आहे. त्या व्यक्तीची बहीण मरण पावल्यानंतर तिला अग्नी देण्यात आला. तेव्हा ती निर्वस्त्र झाली. तेव्हा सर्व जण पाहत होते आणि त्या व्यक्तीला ती खूप शरमेची गोष्ट वाटली. तेव्हा ती व्यक्ती तिथून निघाली. त्या व्यक्तीने असा विचार केला, की आज आपल्या बहिणीला लोक पाहत आहेत. उद्या आपल्या मुलीचा मृत्यू झाला, तर तिलाही लोक असे पाहतील. तेव्हा त्या व्यक्तीच्या असं मनात आलं, की इस्लामपेक्षा कोणताही धर्म चांगला नाही. म्हणून तो स्वीकारला पाहिजे, असं त्या व्यक्तीला वाटलं. इस्लाममध्ये मुली-महिलांना मृत्यूनंतर अग्नी दिला जात नाही, तर दफन केलं जातं.’
हा प्रकार सरकारी अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानात घडल्याचं दिसत असल्याने, तसंच धर्म आणि धर्मांतराच्या अनुषंगाने वेगवेगळे दावे केले जात असल्याने त्यावर उलटसुलट चर्चा होत आहेत.