बिहारच्या महिला शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल, IAS अधिकाऱ्याने केले कौतुक

शिक्षिका विद्यार्थ्यांना नृत्य, गाणे, वादन शिकवत आहे

0

बिहार,दि.25: बिहारच्या महिला शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिहारमधील एका महिला शिक्षिकेचा आपल्या विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शिकवण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षिका विद्यार्थ्यांना नृत्य, गाणे, वादन शिकवत आहे. हा व्हिडिओ IAS (आयएएस) अधिकारी दीपक कुमार सिंह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. आता ती सोशल मीडियावर हेडलाईन बनत आहे. विद्यार्थ्याच्या आयुष्यात आई वडिलांप्रमाणेच शिक्षकांचे मोठे स्थान असते.

शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन आपल्या पायावर उभे होण्यासाठी मदत करतात. विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या प्रति अपार आदर असतो. अलीकडे काही शिक्षक पारंपरिक पद्धतीने शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी काही मजेदार पद्धती अवलंबत आहेत.

बिहार येथील एका शिक्षिका देखील मजेदार पद्धीतने आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देताना दिसून आली. तिच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे नेटकरी तिचे कौतुक करत असून, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओनुसार, शिक्षिकेचे नाव खुशबू कुमारी असून ती बांका जिल्ह्यातील काथौन येथील एका प्राथमिक शाळेत मुलांना मजेशीर पद्धतीने शिकवण्याचे काम करत आहे.

एका ठिकाणी शिक्षिका वर्गात विद्यार्थ्यांनी घेरलेली दिसते आणि दुसऱ्या ठिकाणी ती शाळेच्या मैदानात मुलांसोबत लपाछपी खेळताना दिसते. बॉलीवूडचे जुने गाणे ‘लुक चुप जाना मकई का दाना…’ पार्श्वभूमीत वाजत आहे.

शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शिकवत असल्याचे दिसून येते. ती संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहे, त्यांच्यासोबत खेळत आहे. अलीकडे विद्यार्थी अभ्यासाच्या तणावाखाली दिसून येतात. मात्र, व्हिडिओमधील विद्यार्थ्यांना ही शिकवण्याची पद्धत जाम आवडल्याचे दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमललेले दिसते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here