पाणी साठलेलं ठिकाणावरून हातात सायकल पकडून भिंतीवरून चालणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

0

दि.२५: सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral Video) होतात. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. काही व्हिडिओ विचार करायला भाग पाडणारे असतात. सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ (Viral Video) आवडल्यानंतर नेटकरी आपल्या आपल्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर करत असतात.

काही व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की काय डोकं लावलं असेल? असे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक सायकल असलेला व्यक्ती पाणी साठलेलं ठिकाण पार करताना दिसत आहे. मात्र यासाठी त्याने वापरलेली क्लुप्ती लक्ष वेधून घेत आहे. कारण हातात सायकल आणि भिंतीवरून चालत जाणं तसं कठीण आहे. मात्र व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीने ते शक्य करून दाखवलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील ठिकाण एका गावातील असल्याचं दिसत आहे. कारण मातीचा कच्चा रस्ता आहे. तसेच या रस्त्यावर पणी साठलं आहे. त्यामुळे काही जणांनी मध्ये विटा ठेवल्या आहेत. मात्र या विटा अर्ध्यावर असल्याने चिखलात पाय माखतील याचा अंदाज प्रत्येकाला येतो. तसाच अंदाज एका सायकलस्वाराने बांधला. सायकलच्या कॅरिअरवर गाठोडं असलेल्या व्यक्तीने अनोखी क्लुप्ती लढवली आहे. सायकलवर बसून रस्ता ओलांडण्याऐवजी दोन पाय भिंतीवर आणि हातात सायकलचं हँडल पकडत रस्ता पार केला. विशेष म्हणजे सुरुवातीला हा पाण्यात पडेल असं वाटतं मात्र तो यशस्वीरित्या रस्ता पार करतो.

नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here