Video: जंगल सफारीदरम्यान सिंह आला एकदम जवळ, कर्मचारी बसला एकदम शांत

0

दि.6: सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होतात. जंगल (Forest) सफारी दरम्यान अनेक घटना घडतात. सिंहाला (Lion) जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंहाला (Lion) पाहून मोठमोठे प्राणी घाबरतात. सिंहाला पाहिल्यानंतर माणसाला तर भयानक भीती वाटते. सिंहाला पाहिल्यानंतर माणसाला समोर मृत्यू आल्याची जाणीव होते. सध्या सोशल मीडियावर जंगल सफारीचा अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल. जंगलात फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या (Tourist) गाडीजवळ अचानक सिंह पोहोचल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

सिंह या पर्यटकांच्या (Tourist) जवळ पोहोचतो. मात्र, पुढे काय होते ते पाहून तुम्हाला हेही समजेल की कोणताही प्राणी विनाकारण हल्ला करत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आफ्रिकेच्या साबी सबी रिझर्व्हचा आहे. जंगल सफारीसाठी गेलेले लोक जीपमध्ये बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. खडबडीत रस्त्यावरून गाडी जात असताना समोरून दुसरी गाडी येते. त्यामुळे दोन्ही वाहने थांबवावी लागतात. तेव्हाच एक सिंह जंगलातून बाहेर पडतो आणि वाहनांजवळ येतो. जीपच्या बोनेटवर बसलेल्या एका व्यक्तीच्या सिंह अगदी जवळ गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

सिंह त्या व्यक्तीच्या इतका जवळ जातो की ती व्यक्ती घाबरून पुतळाच होते. काही वेळासाठी श्वास रोखून धरते. आपण पाहू शकता की व्यक्ती अजिबात हलत नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या व्यक्तीला असे बसलेले पाहून सिंहही त्याच्यावर हल्ला करत नाही आणि सरळ त्याच्या मार्गावर जातो. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर richard.degouveia नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करण्यासोबतच ‘ट्रॅकर्स सीटवर तुम्हाला कसं वाटेल? सबी सबी अभयारण्यातील प्राणी आजूबाजूला वाहनांच्या उपस्थितीकडे लक्ष देत नाहीत’ असं कॅप्शन लिहिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here