नवी दिल्ली,दि.१५: Video: देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये (Gurugram) हिजाब (Hijab) परिधान केलेल्या एका परदेशी महिलेने रस्त्यावर सुमारे अर्धा तास गोंधळ घातला. एवढेच नाही तर या विदेशी महिलेने टॅक्सी चालकाला धक्काबुक्की करून जखमी केले. चालकाला धक्काबुक्की केल्यानंतर ही महिला गुरुग्राममधील राजीव चौकातून पळू लागली. टॅक्सी चालक त्याच्या मागे लागला. काही अंतरावर उभ्या असलेल्या पोलिसांनी महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला असता तिचीही पोलिसांशी बाचाबाची झाली. बऱ्याच प्रयत्नांनंतर गुरुग्राम पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. बराच वेळ रस्त्यावर हे नाट्य सुरूच होते.
टॅक्सी चालकाचा आरोप आहे की, ‘या महिलेने कुठेतरी जाण्यासाठी कार थांबवली. मी कुठे जाणार असे विचारताच या महिलेने पिशवीतून चाकू काढून माझ्यावर हल्ला केला. पोलीस सध्या या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचंही सांगण्यात येत आहे, मात्र सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून त्यानंतरच महिलेची मानसिक स्थिती बिघडली आहे का, या संपूर्ण प्रकरणामागे कोणाचा हात आहे, हे कळेल. टॅक्सी चालकावर हल्ला करण्याचा काय होता महिलेचा हेतू? हे समजेल.