Video: ट्रेलरने अचानक टर्न घेतल्याने झालेल्या अपघात ३ ठार

0

दि.१३: Video: Video: ट्रेलरने अचानक टर्न घेतल्याने झालेल्या अपघात ३ ठार झाले आहेत. हा अपघात CCTV त कैद झाला आहे. भरधाव वेगाने निघालेला ट्रेलर रस्त्यावर पलटी होऊन झालेल्या अपघातात एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघे कारमधून प्रवास करत असताना ट्रेलर पलटी होऊन त्यांच्या वाहनावर कोसळला. पंजाबमधील बेहराम येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेला हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

व्हिडीओमध्ये माल भरलेला १८ चाकांचा ट्रेलर रस्त्याने येताना दिसत आहे. मात्र आपला वेग कमी न करता किंवा कोणताही सिग्नल न देता ट्रेलर चालक अचानक वळण घेतो. यावेळी वेगात असलेल्या ट्रेलरचा तोल जातो आणि रस्त्यावर कोसळतो. दरम्यान, ट्रेलर वळण घेण्याची कोणतीही कल्पना नसल्याने रस्त्याने धावणारी तीन वाहनं जाऊन ट्रेलरवर आदळतात. यावेळी ट्रेलर कोसळत असताना एक गाडी त्याच्या खाली येते.

या अपघातात आई, वडील आणि मुलगा यांचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. पोलिसांनी ट्रेलरचा चालक मेजर सिंगविरोधात बेदरकारपणे वाहन चालवण्यासहित इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here