Sujat Ambedkar: वंचितचे सुजात आंबेडकर यांचे शरद पवारांवर मोठं वक्तव्य

0

कल्याण,दि.१६: बंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोठं वक्तव्य केले आहे. केतकी चितळेने (Ketaki Chitale) शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. सुजात आंबेडकर यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुजात यांनी केतकीवर टीका करताना शरद पवार हे जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व असल्याचं म्हटलंय.

“अभिनेत्री केतकी चितळेने केलेली पोस्ट अत्यंत घाणेरडी होती,” अशी प्रतिक्रिया सुजात यांनी दिली आहे. कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमात सुजात सहभागी झाले होते. यावेळेस बोलताना त्यांनी केतकी चितळे प्रकरणावर भाष्य केलं. “सोशल मीडियाचा वापर सर्वांनी लक्षपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. सध्या जे काही ट्रोलिंग होतं, त्यामुळं नेत्यांना मानसिक आरोग्याचाही त्रास होऊ शकतो. केतकी चितळेचं वक्तव्य अतिशय घाणेरडं आणि चुकीचं असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल, तर धोरणांवर, भूमिकांवर, राजकारणावर टीका करा,” असं सुजात म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना, “एखाद्याच्या अंगावर, दिसण्यावर टीका करु नका,” असं सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. “शरद पवारांबद्दल महाराष्ट्रभरात आदर असून त्यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य शोभनीय नव्हतं. जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार हे प्रेरणादायी आहेत. कारण कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतकं बोलतात, लोकांना भेटतात, भाषणं करतात, त्यामुळं त्या नेत्याबद्दल असं बोलणं चुकीचं आहे,” असं सुजात म्हणाले. केतकीने शरद पवारांवर टीका करताना त्यांचा चेहरा आणि बोलण्याच्या पद्धतीवरुन टीका केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here