लग्न दीराच चर्चा मात्र वहिनीची, वहिनीनी केला जबरदस्त डान्स

0

सोलापूर,दि.30: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. अनेक व्हिडिओ युजर्सच्या पसंतीस उतरतात. दीर वहिनीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. वहिनीचे दीराशी पवित्र नाते असते. वहिनी ही बहिणीची, आईची भूमिका निभावते.

वहिनी दिराच्या (Brother in law) लग्नाचा प्रत्येक कार्यक्रम, विधी-परंपरेत ती पुढाकार घेते. अशाच हौशी वहिनीने आपल्या दिराच्या (Dever bhabhi video) लग्नात असं काही केलं की अगदी दिरही इम्प्रेस झाला. आपल्या लग्नात नवरीबाईला सोडून नवरदेव थेट वहिनीकडेच पळाला.

काही लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात लग्नामध्ये दिर आणि वहिनीची केमिस्ट्री पाहायला मिळते. वहिनी आणि दिराचं बाँडिंग किती घट्ट असतं हेच या व्हिडीओतून दिसून येतं. कारण जेव्हा वहिनी लग्नात डान्स करते तेव्हा दिराला मोह आवरत नाही आणि तो आपल्या नवरीला सोडून वहिनीसोबत ठेका धरायलाही मागेपुढे पाहत नाही. अशाच दीर-वहिनी जोडीच्या डान्सचा हा भन्नाट व्हिडीओ आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक महिला स्टेजवर डान्स करताना दिसते आहे. ही महिला म्हणजे नवरदेवाची वहिनी आहे. सुरुवातीला ती स्टेजवर एकटीच डान्स करताना दिसते. पण तिला नाचताना पाहून दीरही आऊट ऑफ कंट्रोल होतो आणि तोसुद्धा स्टेजवर पळत येतो. आपल्या नवरीला एकटं सोडून तो वहिनीसोबत थिरकायला येतो. काही वेळाने त्याला नवरीची आठवण येते आणि तसा तो स्टेजवरून धावत जाऊन नवरीलासुद्धा स्टेजवर घेऊन येतो आणि मग तिघंही स्टेजवर धम्माल करताना दिसतात. रजत गुप्ता युट्यूब युझरने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here