दि.21: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 56 व्या DGP IGP परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तीन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्याच दरम्यान सीएम योगी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा त्यांचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसत आहेत.
फोटोमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान राजभवनाच्या कॉरिडॉरमध्ये मुख्यमंत्री योगींच्या खांद्यावर हात ठेवून फिरताना आणि सखोल चर्चा करताना दिसत आहेत.
आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत एका कवितेतून आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी लिहिलं, ‘हम निकल पड़े हैं प्रण करके, अपना तन-मन अर्पण करके, जिद है एक सूर्य उगाना है, अम्बर से ऊंचा जाना है, एक भारत नया बनाना है.’
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी फोटो शेअर केला आहे. प्रसिद्ध टीव्ही पत्रकार रुबिका लियाकत यांनीही फोटो शेअर करत “योगी भी, मोदी भी… तस्वीर लखनऊ की” असे ट्विट केले आहे.