Urfi Javed On Puspha: पुष्पाच्या गाण्यावर उर्फी जावेदचा किलर परफॉर्मन्स, साडीत सौंदर्य खुलले

0

दि.22: Urfi Javed On Puspha: इंटरनेट आपल्या व्हिडिओने धुमाकूळ घालणारी उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा तिच्या नवीन व्हिडिओसह धुमाकूळ घालताना दिसत आहे. एका छोट्या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद आपल्या सौंदर्याने लोकांना घायाळ करत आहे. पुष्पा द राईज (Pushpa: The Rise) चित्रपटाचा अनेकांवर प्रभाव दिसून येतो. पुष्पा द राईज चित्रपटातील गाण्यावर अनेकजण व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

उर्फी जावेदचा नवीन व्हिडिओ

उर्फी जावेद पूर्वीपेक्षा जास्त सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर पूर्वीपेक्षा काही अधिक रील बनवण्यास सुरुवात केली आहे. कदाचित वाढत्या फॅन फॉलोइंगचा परिणाम होऊ शकतो. यावेळी व्हिडिओमध्ये उर्फीने ग्लॅमरस आउटफिट नाही, तर साडी नेसली आहे. उर्फी जावेद पांढऱ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत आहे. साडी नेसून उर्फीने एक व्हिडिओही बनवला.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली’ या गाण्यावर आपल्या सौंदर्याची झलक दाखवताना दिसत आहे. उर्फीने ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यावर व्हिडिओ बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अल्लू अर्जुनच्या चित्रपटा विषयी आपली आवड दाखवली आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली’ हे गाणे सध्या खूप ट्रेंड करत आहे. त्यामुळेच उर्फीने व्हिडीओ बनवून मोक्यावर चौका मारला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here