मुंबई,दि.१४: उर्फी जावेदने (Urfi Javed) ट्विटच्या माध्यमातून पुन्हा भाजपा नेत्या एकदा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना डिवचले आहे.
उर्फी जावेद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फीच्या बोल्ड कपड्यांवरून वाद सुरू आहे. उर्फीच्या बोल्ड कपड्यांवरून सुरू झालेला वाद मागील काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. आता हे प्रकरण आणखीच तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर मुंबई पोलिसांकडून उर्फीला नोटीस पाठवण्यात आली होती. यासोबतच मुंबई पोलीस आयुक्तांनीही चौकशीचे आदेश दिले होते. आता उर्फीने मुंबई पोलिसांसमोर जाऊन आपली बाजू मांडली आहे. (Urfi Javed On Chitra Wagh)
उर्फी जावेद मुंबई पोलिसांसमोर हजर | Urfi Javed
मुंबई पोलिसांसमोर हजर होऊन उर्फीने तिची बाजू मांडताना म्हटले, “‘मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. मला शूट करायला आणि वेगवेगळे कपडे घालायला आवडतात. आपल्या संविधानात हा गुन्हा नाही. जेव्हा मी अशा शूटसाठी बाहेर पडते तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी मला शोधतात, मला फॉलो करतात आणि माझे फोटो क्लिक करतात आणि ते फोटो व्हायरल होतात. मी ते व्हायरल करत नाही.”
उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचले | Urfi Javed On Chitra Wagh
याशिवाय उर्फीने ट्विटच्या माध्यमातून भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले, “एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे, तो स्त्रियांच्या बाबतीत खूप उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कुठल्या संस्कृतीबद्दल बोलताय?”. अशा शब्दांत उर्फीने चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला आहे.

उर्फीने घेतली होती महिला आयोगात धाव
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर उर्फी जावेदने महिला आयोगात धाव घेतली. उर्फीने देखील कठोर पाऊल उचलत चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. अलीकडेच उर्फीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. आपल्या जीवाला धोका असल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते.