UP Election: प्रचार करताना अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी आले समोरासमोर

0

दि.3: UP Assembly Election 2022: राजकारणात अनेक वेळा अनपेक्षित घटना घडतात. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत (Uttar Pradesh Elections 2022) सर्वच पक्ष आपापल्या शैलीत जोरदार प्रचार करत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) आपला पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या निवणुकीसाठी आज त्या बुलंदशहरमध्ये आपल्या समर्थकांसह प्रचार करत होत्या. मात्र तेथे त्यांची सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांची समोरासमोर भेट झाली.

अखिलेश आणि जयंत हे दोघेही तिथे प्रचारासाठी आले होते. मात्र प्रियंका गांधींचा ताफा त्यांच्यासमोर येताच दोघेही थांबले आणि नंतर एकमेकांकडे पाहत अभिवादन केले. हे दृश्य पाहून दोन्ही पक्षांचे समर्थक जल्लोषात नाचू लागले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आता दोन्ही बड्या नेत्यांची ही शैली चर्चेचा विषय बनली आहे. हे देखील महत्त्वाचे आहे कारण कोणतीही युती न करताही काँग्रेस आणि सपा यांच्यात समझोता झाला आहे. हाच राजकीय समझोता असल्याने काँग्रेसने करहाल मतदारसंघातून एकही उमेदवार उभा केला नाही आणि अखिलेश यादव यांना मोकळे मैदान दिले आहे. जसवंत नगर जागेसाठी काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. शिवपाल यादव यांना सहज विजय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. तसेच सपाकडून अमेठी आणि रायबरेलीमधून एकही उमेदवार उभा करण्यात आलेला नाही. तेथे काँग्रेसला थेट भाजपशी टक्कर देण्याची संधी देण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here