अलिबाग,दि.1: केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) अलिबाग न्यायालयात हजर झाले आहेत. नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे याची सोमवारी 23 ऑगस्ट रोजी दक्षिण रायगडमध्ये यात्रा सुरू झाली होती. या यात्रेदरम्यान महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते.
याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राणे याना संगमेश्वर येथून त्यांना अटक केली होती. गुरुवारी 1 डिसेंबर रोजी अलिबाग जिल्हा न्यायालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे सुनावणीसाठी हजर झाले आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबाबत नारायण राणे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महाड न्यायालयाने त्यांना अटी शर्थीवर जामीन मंजूर केला होता. महाड न्यायलायातून राणे यांचा खटला अलिबाग जिल्हा न्यायालयात वर्ग झालेला आहे. आज जिल्हा न्ययलायात खटल्याची सुनावणी होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतः उपस्थित राहणार असून वकिलांची फोज त्याच्या सोबत आहे.