केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवींचं राज ठाकरेंच्या भूमिकेवर मोठं विधानं

0

नवी दिल्ली, दि.17: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवीनीं (Mukhtar Abbas Naqvi) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भूमिकेवर मोठं विधानं केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी आवाहन केले आहे. आपला प्रार्थनेला विरोध नाही, मात्र ध्वनी प्रदूषणाला विरोध आहे, भोंग्याचा त्रास फक्त हिंदूनांच होत नसून मुस्लिमांनाही होतो असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी 3 मेपर्यंत भोंगे हटवावे अन्यथा मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे देशभरात होणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसह १३ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिले आहे. त्यावर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी भाष्य केले आहे.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी(Mukhtar Abbas Naqvi) म्हणाले की, पंतप्रधान मोदींना पत्र देणारे त्यांचा इतिहास काढला तर त्यांना लाज वाटेल. ज्यांच्या शासन काळात भिवंडी हिंसाचार घडला, बिहारच्या भागलपूर येथे हिंसाचार घडला. मेरठ, दिल्ली हिंसाचार घडले आहेत. पुरोगामीचा बुरखा पांघरून लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम हे लोकं करत आहेत. मात्र ते यशस्वी होत नाही. मोदींच्या काळात हिंसाचार घडावा यासाठी हे सगळं केले जात आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच देशात हिंदू मुस्लीम नव्हे तर मोदी सरकार सर्व भारतीयांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. प्रार्थना ही शांततेसाठी असते, तणाव निर्माण करण्यासाठी नाही. ध्वनी प्रदुषणाबाबत सगळीकडे कायदे बनले आहेत. कायद्याचे पालन व्हायला हवे. ध्वनी प्रदुषणावर कायदा बनले आहेत कुणीही त्याचे उल्लंघन करू नये असं सांगत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राज ठाकरेंच्या(Raj Thackeray) भोंगे हटाव भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here