केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्टेजवर मारल्या दोरीउडया

0

नवी दिल्ली,दि.१०: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका मीडिया समुहाच्या कार्यक्रमामध्ये चॅलेंज मिळाल्यावर अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. थेट स्टेजवर दोरीच्या उड्या मारण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्र्यांच्या दमदार कामगिरीला उपस्थित प्रेक्षकांकडून देखील मोठी दाद देखील मिळाली. जितक्या वेळा ठाकूर यांनी दोरीउड्या मारल्या तितक्या वेळा लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्याचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. 

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दोरीउड्या मारतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. अनुराग ठाकूर यांनी स्वतः देखील आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते चक्क कुर्ता-पायजामामध्ये भर मंचावर विविध प्रकारे दोरीवरच्या उड्या मारताना दिसून आले आहेत. तसेच “खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन होणं आवश्यक आहे” असं देखील ठाकूर यांनी म्हटलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here