Ukraine Viral Video: युक्रेनच्या नागरिकांने रशियन सैनिकांना दिली ही ऑफर, Video व्हायरल

0

Ukraine Viral Video: रशिया युक्रेन युद्धात (Russia-Ukraine crisis) अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहेत.रशियन रणगाडे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. काही तासांत कीवपर्यंत धडक मारणाऱ्या रशियन फौजांची युक्रेनमध्ये खूपच दयनीय अवस्था झाली आहे. अनेक रणगाडे नादुरुस्त किंवा इंधन संपल्याने वाटेतच बंद पडले आहेत. तर त्यातील सैनिक अन्न पाण्यावासून हैराण झाले आहेत. यातच एका शेतकऱ्याने रशियन रणगाडाच पळून नेल्याने रशियाची सर्वत्र नाचक्की होऊ लागली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करुन पाच दिवस लोटले आहेत. मात्र बलाढ्य रशियाला युक्रेनच्या लष्कराबरोबरच सर्वसामान्य व्यक्तीही विरोध करत आहेत. बरं हा विरोध केवळ शक्तीने केला जात नसून युक्तीने आणि तितक्याच हलक्यापुलक्या पद्धतीने म्हणजेच विनोदी पद्धतीनेही केला जातोय. असाच एक प्रसंग समोर आलाय.

देशाची राजधानी असणाऱ्या किव्ह शहराजवळ रशियन लष्कराच्या रणगाड्यामधील इंधन संपल्याने तो बंद पडला. रस्त्याच्या मधोमध रणगाडा बंद पडल्याने रशियन सैनिक रस्त्यावर उतरुन उभे होते. तितक्यात एक युक्रेनचा नागरिक गाडीने जात असताना तिथे जाऊन थांबला आणि त्याने रशियन सैनिकांना एक ऑफर दिली. ही ऑफर होती त्यांना रशियात परत नेऊन सोडण्याची.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये युक्रेनमधील एक कारचालक रस्त्यात बंद पडलेल्या गाडीच्या जवळ येऊन थांबताना दिसतो. नंतर तो रशियन सैनिकांची चौकशी करत तुमचा रणगाडा बंद पडलाय का असं त्यांना विचारतो.

चौकशीनंतर त्या युक्रेनच्या व्यक्तीला उत्तर देताना रशियन सैन्याने रणगाड्यामधील इंधन संपल्याची माहिती दिली. त्यावर तो चालक हसला आणि त्याने, “मी तुम्हाला परत रशियात सोडून येऊ का?”, असा प्रश्न विचारला. त्याचा हा प्रश्न ऐकून सर्वजण हसू लागले. सोशल मीडियावरील माहितीनुसार या चालकाने सैनिकांना नक्की कुठे जायचंय असं विचारलं. त्यावर सैनिकांना नेमकं ठिकाण सांगता आलं नाही. तेव्हा या चालकाने तुम्ही देशाची राजधानी असणाऱ्या किव्ह शहराच्या वाटेवर आहात असं सांगितलं. त्यानंतर या रशियन सैनिकांनी युद्धाची स्थिती काय आहे याबद्दल विचारपूस केली. त्यावर चालकाने “युक्रेन जिंकतोय आणि रशियन शरण येतायत,” असं सांगितलं. यामधून त्याला समोरच्या सैनिकांना तुम्ही सुद्धा शस्त्र टाकून द्या असा संदेश द्यायचा होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here