Ukraine Russia News: युक्रेनची (Ukraine) राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियाने आता मोठा लष्करी ताफा पाठवला आहे. युक्रेन-रशिया युद्धाचा (Russia Ukraine War) आज सहावा दिवस आहे. दरम्यान, रशियाचा 40 मैल (64-किमी) लांबीचा ताफा कीवच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली आहे. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनला पाठवलेला हा सर्वात लांब लष्करी ताफा आहे. याआधी रशियन ताफ्यांचा आकार 3 मैलांपर्यंत होता.
मॅक्सार टेक्नॉलॉजीज या अंतराळ कंपनीकडून समोर आलेली छायाचित्रे भीतीदायक आहेत. ताफ्याबरोबरच कीवच्या शेजारील भागात जळणारी घरेही दिसत आहेत. सध्या हा काफिला कीवच्या वायव्येस 45 किमी अंतरावर दिसत आहे.
रशिया-युक्रेन यांच्यात सोमवारी बेलारूसमध्ये चर्चा झाली, मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. रशियन सैन्याने लवकरात लवकर संपूर्ण युक्रेनमधून माघार घ्यावी, अशी युक्रेनची इच्छा आहे. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाली आहे, लवकरच दुसऱ्या फेरीची बैठकही होऊ शकते.
हा ताफा दक्षिणेकडील अँटोनोव्ह विमानतळ Antonov airport क्षेत्रापासून सुरू होत आहे आणि उत्तरेकडील प्राइबिर्स्क Prybirsk भागात संपतो. या ताफ्याची एकूण लांबी सुमारे 40 मैल आहे. रशियन ताफ्यात शेकडो लष्करी वाहने, रणगाडे, तोफखाना इ. सामील आहे. कीवच्या आधीच्या वाटेवर इव्हांकिव परिसरात काही घरे जळताना दिसली आहेत. रशियन तोफखाना त्याच्या जवळ उभा आहे, त्यावरून अंदाज लावता येतो की हल्ला त्याच्या बाजूने झाला असावा. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियन सैन्याच्या ताफ्याचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठीही तयारी करण्यात आली आहे.