ukraine indian students: युक्रेनमध्ये सुरक्षा दलांनी भारतीय विद्यार्थ्यांना केली मारहाण

0

दि.28: ukraine indian students: युक्रेनच्या सुरक्षा दलांवर युक्रेनच्या सीमेजवळ विद्यार्थ्यांना मारहाण (ukraine indian students beaten) केल्याचा आरोप आहे. कसे तरी मोठ्या संख्येने विद्यार्थी रोमानियाच्या सीमेवर पोहोचले आहेत. मात्र त्यांना अजूनही रुमानियाच्या सीमेवर प्रवेश मिळालेला नाही. युक्रेनच्या सीमेजवळ काही भारतीय विद्यार्थ्यांवर युक्रेनच्या सुरक्षा दलांनी हल्ला केला आहे. पोलिसांनी लाठीमार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. काही ठिकाणी भेदभाव केला जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

एका ठिकाणी सुरक्षारक्षकांनी हवेत गाेळीबार केल्याचा व्हिडिओ समाेर आला आहे. युद्धामुळे युक्रेनमधून पाेलंड आणि हंगेरी या देशांमध्ये स्थलांतर करण्यासाठी भारतीयांसह हजाराे युक्रेनी नागरिकही सीमेवर धडकले आहेत. मात्र, युक्रेनच्या सुरक्षारक्षकांनी भारतीयांना पाेलंडची सीमा पार करू देण्यात अडचणी निर्माण केल्या असून काही जणांना बेदम मारहाण केली आहे. (ukraine indian students beaten)

साक्षी इजनकर या विद्यार्थिनीने या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. तिने सांगितले, की पाेलंडच्या सीमेवर आम्हाला युक्रेनच्या सुरक्षारक्षकांनी घेरले हाेते. तेथून केवळ युक्रेनच्या नागरिकांना पाेलंडमध्ये प्रवेश देण्यात येत हाेता. खूप विनवणी केल्यानंतर मुलींना साेडण्यात आले. मात्र, त्यानंतर पाेलिसांनी भारतीय मुलांना बेदम मारहाण केली. केरळच्या ॲंजेल नावाच्या विद्यार्थिनीनेही हाच अनुभव सांगितला. तिला आणि तिच्या मित्रमैत्रिणींना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. अशा प्रकारच्या मदतीची आम्हाला अपेक्षा नाही, असे ती म्हणाली. 

व्हिडिओ व्हायरल

एका सीमेवर रात्रीच्या सुमारास युक्रेनचा सुरक्षारक्षक भारतीय विद्यार्थ्यांना लाथ मारतानाचा व्हिडीओ फेसबुकवर पाेस्ट करण्यात आला आहे. त्यात ताे संयुक्त राष्ट्राच्या सभेत भारताने युक्रेनच्या बाजूने मतदान का केले नाही, याचा जाब भारतीय दूतावासाला विचारायला सांगत असल्याचे ऐकू येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here