Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मालेगावात उर्दू होर्डिंग

0

नाशिक,दि.26: Uddhav Thackeray : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मालेगावात (Malegaon) सभा होणार आहे. राजकीय पार्श्वभूमीवर महत्वाची सभा मानली जात आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मालेगावात मराठीसोबत उर्दू होर्डिंग लावण्यात आले आहे. मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगांव” असा होर्डिंगवर उल्लेख करण्यात आला आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. आहे. पक्षातील आमदार-खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्ष बांधणीसाठी सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाला उभारी मिळण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांची खेडनंतर आता मालेगावात मोठी सभा होणार आहे. या मालेगावातील सभेआधीच उद्धव ठाकरे यांच्या उर्दू भाषेतील बॅनरची चर्चा सुरू झाली आहे.

आज नाशिक (Nashik) जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या मालेगाव शहरात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मालेगावमध्ये उर्दू भाषेतील (Urdu Hoardings) होर्डिंग्स लावण्यात आलेत या होर्डिंगचा खासदार संजय राऊत यांनी सुद्धा समर्थन केले. उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव मध्ये जाहीर सभा होत आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा हा गड मानला जातो आणि याच ठिकाणी अद्वय हिरे यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर खेड नंतरची ही दुसरी महाराष्ट्रातली उद्धव ठाकरेंची सभा आहे आणि या सभेसाठी मालेगावमध्ये ठिकठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहेत.

मालेगाव शहरात आज शिवसेना ठाकरे गटाची जाहीर सभा होत असून अनेक ठिकाणी उर्दू भाषेमध्ये देखील होर्डिंग लागलेले आहेत. ‘शिवसेनेचे मालेगाव मालेगावची शिवसेना’ अशा स्वरूपाचे हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यांमध्ये या होर्डिंगविषयी त्याचबरोबर मालेगावमध्ये होणाऱ्या सभेविषयी उत्सुकता आहे. याआधी देखील शिवसेनेचे कॅलेंडरचे उर्दू भाषेमध्ये छापण्यात आलेले होते. त्यावर देखील टीका झालेली होती. आजही संजय राऊत यांनी सांगितलं की, उर्दू भाषा ही सर्वांची भाषा आहे, उर्दू भाषेमध्ये जर होर्डिंग छापले तर त्यामध्ये गैर काय? अशा स्वरूपाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. इथल्या मुस्लिम समुदायाला आकर्षित करण्यासाठी अशा उर्दू भाषेतील होर्डिंग लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे, मात्र खासदार संजय राऊत यांच्याकडूनया होर्डिंग्सचे समर्थन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here