Uddhav Thackeray | कोणी कोणावर विश्वास ठेवायचा हा सध्या मोठा प्रश्न आहे: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: तुम्ही सगळं चोराल पण आमची हिम्मत चोरू शकणार नाही

0

नागपूर,दि.27: Uddhav Thackeray On Maharashtra Politics | शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये पदाधिकारी मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray On Shinde Group) याशिवाय भाजपसोबत युती असताना जी चूक झाली ती चूक आता पुन्हा करायची नाही, असं म्हटलं. कोणी कोणावर विश्वास ठेवायचा हा सध्या मोठा प्रश्न आहे. लोकशाहीत गुप्त मतदान असतं, पण आता आपलेच मतदान आपल्या पासून गुप्त असतं ते सुरुत, गुवाहटी, गोवा अस फिरतंय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. अजातशत्रू हा शब्द शिवसेनाप्रमुखांना शब्दच आवडायचा नाही. ज्याला शत्रू नाही तो कसला मर्द असा प्रश्न ठाकरेंनी केला. तुम्ही सगळं चोराल पण आमची हिम्मत चोरु शकणार नाही. सामन्याला समोर या मग दाखवतो बाळासाहेबांचे शिवसैनिक कोण आहेत, असं आव्हान ठाकरे यांनी दिलं.

सत्तार, राठोड आणि देसाई यांना भाजपच टाचणी लावत नाही ना? | Uddhav Thackeray On Shinde Group

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आता मोर्चा उघडला आहे. सरकारमधील एकामागून एक अशा तीन मंत्र्यांवर मविआ (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र शिंदे गटातील (Shinde Group) मंत्र्यांचे हे प्रकरण बाहेर काढण्यात भाजपचा (BJP) तर हात नाही ना? असा प्रश्न आता ठाकरे गटाचे नेते करत आहे. यावरच बोलताना आता स्वतः ठाकरे म्हणाले आहेत की, ”ज्या प्रकारे त्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत, यांना भाजप तर टाचणी लावत नाही ना? ही बरोबर त्याच मंत्र्यांची कशी येत आहे. हा विचार त्यांनी केला पाहिजे.” ते म्हणाले, ”निवडणुकीला अजून अवकाश आहे, असं आपण मानतो. माझ्या मते येत्या वर्ष भरात निवडणूक होऊ शकतात.”

Uddhav Thackeray On Maharashtra Politics
उद्धव ठाकरे

वर्षभरात मध्यावधी होणार | Uddhav Thackeray On Maharashtra Politics

नागपूरमध्ये आल्यानंतर पाहिलं तर होर्डिंग्ज लागले आहेत. मी काढलेले फोटो त्या गद्दारांच्या होर्डिंग्जवर आहेत. निवडणुकीला अवकाश आहे अस आपण मानतो. वर्षभरात मध्यावधी होणार असं वाटत असल्याचं ठाकरे म्हणाले. तोतयांनी सांगावे ते भाजपच्या उमेदवारीवर लढणार नाहीत, असं आव्हान देखील त्यांनी दिलं. गेल्या चार पाच महिन्यात किती घोटाळे समोर आले. रोज फुटतायत ती बॉम्बची माळच. मी मुख्यमंत्री असताना लाथ मारून हाकलले तेव्हा आता त्याचा पण घोटाळा निघाला, असं म्हणत संजय राठोड याचं नाव न घेता ठाकरेंनी टीका केली. ठाकरेंनी यावेळी हर्षवर्धन पाटलांचा छान झोप लागते वाक्याचा संदर्भ दिला. ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे तुमच्याकडे आले आहेत. पंतप्रधान नागपूरला आले होते तेव्हा त्यांनी आजूबाजूला बघायचे होते. भ्रष्टाचारासंदर्भात पंतप्रधानांची भावना प्रामाणिक असेल, असं ठाकरे म्हणाले.

जाहिरात

आजची बैठक अपेक्षेपेक्षा मोठी झाली

आजची बैठक अपेक्षेपेक्षा मोठी झाली आहे. आपण कस्तुरचंद पार्कला सभा घेतली होती. “देता का जाता” आंदोलनाची सभा शेतकऱ्यांसाठी होती. आजही तोच विषय आहे. पोलीस आयुक्त म्हणाले ८-१० हजार लोक येतील. मी म्हटले मै बाळासाहेब का बेटा हू. आपण जे करतो ते रोखठोक असतं. आपले पूर्वसंचित म्हणून लोक येतात आणि ती सभा यशस्वी झाली, असं ठाकरे म्हणाले. तुम्ही उपस्थित का गेले नाही मिंधे गटात, तुम्हाला पण बोलावणं आल असेल. पण तुम्ही निष्ठा दाखवली नितिन देशमुख, कैलास पाटील संजय राऊत ही याची उदाहरणे आहेत. संजय राऊत तिकडे गेले असते तर त्यांच्या भोवती रांगोळी काढली असती पण त्यांनी निष्ठा दाखवली प्रसंगी तुरुंगवास भोगला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

झाड आणि झाडाची मूळ आहेत तोवर…

झाड आणि झाडाची मूळ आहेत तोवर फुल फळांची मला चिंता नाही. पूर्व विदर्भाची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आपण भाजपला मोकळीक दिली होती. पण आता नाही द्यायची. आता मशाल पेटवलीय. शिवसेना हा विचार आहे व्यक्ती नाही, असंही ते म्हणाले. तुमच्या आशीर्वादाने बघा मी काय करतो. ही शेवटची लढाई असल्यासारखं लढूया. यापुढे आपल्या विचारांचा विजय होईल. आपल्याच लोकांनी आपल्यावर वार केल्याचे अनेक अनुभव आले असून यातून पण तुम्ही निष्ठावंतांनी शिवसेनेचा इतिहास घडवला, असं ठाकरे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here