‘राजकारण्यांना किती पेन्शन मिळते आणि तुम्हाला किती पेन्शन…’ उध्दव ठाकरे

0

शिर्डी,दि.15: माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत (Old Pension Scheme) मोठी घोषणा केली आहे. शिर्डीतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन महाधिवेशनात ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी होत असलेल्या महाअधिवेशनाला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी महायुती आणि शिंदे यांच्यावर जबरदस्त प्रहार केले. 

जुनी पेन्शन योजना | Old Pension Scheme

ज्यांनी विश्वासघात केला, आईसारख्या शिवसेनेवर वार केले, त्यांच्यावर जनता कसा विश्वास ठेवणार , असा सवाल करत आता हे विश्वासघताकी सरकार घालवून आपले सरकार आणण्याची गरज आहे. ही बदलाची ताकद तुमच्यात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आपले सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी लागू करण्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

तुम्हाला किती पेन्शन मिळते

राजकारण्यांना किती पेन्शन मिळते आणि तुम्हाला किती पेन्शन मिळते, ही तफावत तुम्ही पाहिली. सरकार तुम्ही चालवत आहात. कोरोना काळात तुम्ही काम केले म्हणून राज्य वाचले. योजना सरकार जाहीर करते पण ती घराघरांत जाऊन तुम्ही राबवता. तुम्ही साथ दिली नाही, तर कोणतेच सरकार राहू शकत नाही. आता लाडकी बहीण योजना आणली पण भाऊ कोण हेच तिला कळत नाही. 

ते भाऊ नसून फुकटखाऊ

प्रत्येकजण मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ असे म्हणत आहेत. मात्र ते भाऊ नसून फुकटखाऊ आहेत. जनतेच्या पैशांवर फुकटखाऊ म्हणतात मीच तुझा भाऊ, असे सध्या सुरू आहे. योजना तुम्ही राबवता मग योजनेवर फोटो कोणाचे असतात. तुम्ही करणाऱ्या कामचे श्रेय हे उपटसुंब घेत आहेत. आपणही शेतकरी कर्जमुक्ती केली, पण त्याचा असा गाजावाजा केला नाही. आपण आपले काम केले. आता फक्त गाजावाजा होत आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here