ठाणे,दि.10: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचे समजल्यानंतर काय घडले, हे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. ”बाळासाहेब ज्या देव्हारातील देवांची पूजा करायचे त्या देव्हाऱ्यात धनुष्यबाण ठेवले होते, त्याची पूजा देखील बाळासाहेब करायचे, ते चिन्ह आज गोठवलं आणि हे सांगताना उद्धव ठाकरे यांचा बांध फुटला. ज्या चिन्हावर तुम्ही मंत्री झालात, निवडून आला, तेच चिन्ह तुम्ही गोठवलं. आज उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आले, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
शिवसेनेकडून आता प्रबोधन यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरू झाली. या यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.
‘दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर बसलेली मंडळी ही खरी होती तर BKC येथे जमलेली मंडळी गटारी करता जमलेली मंडळी होती. कौजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधात केशर पिस्ता घालून गोडी वाढवली जाते पण या ४० गद्दारांनी या दुधात मीठ घातलंय. कारण काल रात्री यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवली, हे कळताच मला रडू आले आणि अतिशय वाईट वाटलं, ज्या चिन्हावर तुम्ही मंत्री झालात निवडून आलात तेच चिन्ह तुम्ही गोठवले आज उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आले, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
‘जयचंद राठोडांमुळे त्यांचा जावई महाराणा प्रताप मोहम्मद घुरीच्या हाती लागले. एकनाथ शिंदे आज तुम्ही भाजपाच्या नादी लागून हेच केलंय. एक ना एक दिवस तुम्हाला जयचंद राठोड सारखा फक्त आणि फक्त पश्चातापच करावा लागेल. हा सर्व डाव भारतीय जनता पार्टीचा आहे. हे फक्त पॅदे आहेत, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.
उद्या कोणतीही निवडणुक येवू द्या त्यात फक्त उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकणार. परवाचे भाषण BKC वरचे ते भाषण नव्हते वाचन होते ते भाषण कोणी लिहून दिले होते ते देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले होते कीस संपुर्ण भाषण वाचल्या शिवाय मानवर केली तर याद राखा, असं म्हणत भास्कर जाधव य़ांनी एकनाथ शिंदे यांची BKC यांच्या भाषणाची नक्कल केली.