मुंबई,दि.17: Uddhav Thackeray PC: स्वातंत्र्यलढ्यात तुमचे किती कार्यकर्ते होते हे आधी पाहावं मग सावरकरांवर बोलावं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. “काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते हे समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे,” असा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाला (Shinde Group) टोला लगावला आहे. तसंच “शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा करतो,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
‘ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला, आज ते धोक्यात आले म्हणून आम्ही लढा सुरू केला आहे. एकत्र आलो आहोत. जो पांचटपणा सुरू केला आहे, तो त्यांनी बंद करावा, पहिल्या आपल्या संस्थेचं स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान आहे, ते सांगावे मग पुढे बोलावं. त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं.
बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मतिदिन आहे. यानिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला भेट दिली. बाळासाहेबांच्या स्मृतिला अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांवर आधारित आयोजित केलेल्या अर्कचित्र प्रदर्शनाला उपस्थिती लावली. याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
“राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाशी मी सहमत नाही. मी आजही स्पष्टपणे सांगू इच्छितो की सावरकरांबद्दल आदर, प्रेम, आपुलकी आमच्या मनात आहेच. ती कधीच पुसली जाणार नाही. पण जे लोक स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते त्यांना स्वातंत्र्यावीरांबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. स्वातंत्र्यलढ्यात तुमचे किती कार्यकर्ते होते हे आधी पाहावं मग सावरकरांवर बोलावं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल विधान केलं, तिथे आदित्य ठाकरे यात्रेत होते. फडणवीस यांनी विधान उपस्थितीत केलं, बरं झाले ते बोलले, ‘सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि प्रेम आहे. कुणी कितीही प्रयत्न केला, तो पुसायचा प्रयत्न जरी केला तरी पुसली जाणार नाही. तो कायम असणार आहे. सावरकर यांच्याबद्दल कुणी प्रश्न विचारावा, यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही, त्यांच्या मातृसंस्थेनं आणि त्यांच्या पिल्लांनी प्रेम व्यक्त करणे हे व्यक्त करणे हास्यास्पद आहे. ते म्हणतील आम्ही कुठे होतो, तर आम्ही नव्हतो. पण संघ तेव्हा सुद्धा होता. पण स्वातंत्र्य लढ्यापासून 4 हात लांब होते. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना फटकारलं.
ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला, आज ते धोक्यात आले म्हणून आम्ही लढा सुरू केला आहे. एकत्र आलो आहोत. जो पांचटपणा सुरू केला आहे, तो त्यांनी बंद करावा, पहिल्या आपल्या संस्थेचं स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान आहे, ते सांगावे मग पुढे बोलावं, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.