मुंबई,दि.28: Uddhav Thackeray On Shivsena MLA: मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बंडखोर आमदारांना आवाहन केले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. शिवसेनेच्या अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. शिवसेनेचे आमदारांनी राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर राज्यात सरकारमध्ये राहण्यास नकार दिला आहे. बंडखोर आमदारांनी अनेकवेळा उध्दव ठाकरेंना सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याची गरज असल्याचे आवाहन केले होते.
शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून सर्व बंडखोर आमदारांना वारंवार आवाहन केलं जात आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी सर्व बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.
“आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, शिवसेनेनं जो मान सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.”, अशी भावनिक सादही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व बंडखोर आमदारांना घातली आहे.