Uddhav Thackeray On BJP: हे अत्यंच नीच आणि विकृतपणाचे कृत्य आहे: उद्धव ठाकरे

0

मुंबई,दि.२५: Uddhav Thackeray On BJP: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी भाजपावर (BJP) जोरदार टीका केली आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) चोख प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा सकाळच्या सत्तेचा प्रयोग यशस्वी ठरला असता तर आज नवाब मलिक आणि अनिल देशमुख भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते. तसेच आम्ही जर तुमच्या गळात पट्टा घातला असता तर आज तुम्ही आमच्या कुटुंबाची जी काही बदनामी करत आहात, ती केली असती का, असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील भाजप नेत्यांना विचारला. (Uddhav Thackeray On BJP)

एकमेकांच्या कुटुंबाची बदनामी करणे, त्यांच्यापाठी चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना तणावात ठेवणे हे अत्यंच नीच आणि विकृतपणाचे कृत्य आहे. तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर येऊन मर्दासारखं लढा. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करायचा, कुटुंबीयांची बदनामी करायची किंवा धाडी टाकायच्या, हा म्हणजे नामर्दपणा असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. (Uddhav Thackeray On BJP)

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केलेल्या भाषणात भाजपकडून करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपला चोख प्रत्युत्तर दिले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात कारवाईचा सपाटा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपने चालवलेला गैरवापर योग्य नाही. यामधून कोणाचेही भले होणार नाही. भाजपने ह्युमन लाँडरिंग सुरु केले आहे का? वाल्याचा वाल्मिकी झाला तसे भाजपवाले बरबटलेल्या माणसांना घेऊन एकदम स्वच्छ करतात. यासाठी उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे उदाहरण दिले.

हर्षवर्धन पाटील पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांना झोप लागत नव्हती. ते भाजपमध्ये गेले आणि त्यांनी झोपेचं औषधं घेतलं. भाजपकडे झोपेचं असं कोणतं औषध आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच २०१४ मध्ये भाजपने शिवसेनेशी युती तोडली. तेव्हाही मी हिंदुत्ववादी होतो. आजही मी कडवट हिंदुत्ववादी आहे आणि यापुढेही राहीन, असेही उद्धव ठाकेर यांनी भाजपला ठणकावून सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here