उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

0

नागपूर,दि.17: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून उपराजधानी नागपुरात सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी आज विधानपरिषद आमदार उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित होते. नागपुरातील हिवाळी अधिवेशात आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सर्वांचा भुवया उंचावल्यात.

नागपुरातील मुख्यमंत्री दालनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली. बंद दरवाज्या आड दोन्ही नेत्यांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर उद्घव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. पण नार्वेकरांच्या कार्यालयाकडे जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय होतं. पण उद्धव ठाकरे यांनी त्या दिशेला तोंड करुनही पाहिलं नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here